शेफ चेतक
मुंबई

चेतक घेगडमल

  • शेफ
  • प्राध्यापक
  • नाटककार

स्वयंपाकघरातली चव आणि रंगमंचावरची गोष्ट, दोन्ही एकाच माणसाच्या हातून. तीस वर्षं हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात शेफ आणि प्राध्यापक म्हणून काम, आणि मराठी रंगभूमीसाठी सातत्याने लेखन.

परिचय

एक माणूस, दोन रंगमंच

स्वयंपाक आणि नाटक, दोन्हीकडे घटक मोजून घ्यावे लागतात, वेळ पाळावी लागते आणि शेवटी समोरच्याला तृप्त करावं लागतं.

शेफ

इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM), अहमदाबादचा 1994 चा विद्यार्थी. तेव्हापासून स्वयंपाकघर हेच कार्यक्षेत्र.

प्राध्यापक

बॅचलर ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीज (BHS) अभ्यासक्रमात फूड प्रॉडक्शन आणि भारताचा सांस्कृतिक व पाककला वारसा शिकवतो. हॉस्पिटॅलिटी संस्थेचा प्रमुख.

नाटककार

मराठी नाटकं, एकांकिका आणि चित्रपटांसाठी लेखन. इतिहासातले क्रांतिकारक, सत्ता, आणि प्रश्न विचारण्याचा सामान्य माणसाचा हक्क हे माझे विषय.

तिसरी घंटा झाली आहे…

नाट्यप्रवास

प्रा. चेतक घेगडमल लिखित नाटकं. संहिता वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

  1. धी हिंदू लेडी

    ऐतिहासिक नाटक

    डॉ. रखमाबाई सावे यांच्या आयुष्यावरचं नाटक. बालविवाहाविरुद्ध उभी राहिलेली आणि स्त्रीशिक्षणासाठी लढलेली एक धाडसी स्त्री, आणि तिच्या मागे उभे डॉ. सखाराम अर्जुन.

    हौशी राज्य नाट्य स्पर्धा 2025: मुंबई केंद्रात प्रथम, अंतिम फेरीत तृतीय. एकूण 18 पुरस्कार.

    अंक
    दोन
    दिग्दर्शन
    शिवानी पेडणेकर
    संहिता
    लिंक लवकरच
  2. नागमुळी

    सत्य-शरणम्

    भजन आणि मुक्तछंदाच्या लयीत लिहिलेलं नाटक. राणी आणि महामात्य यांच्या नात्यातून सत्याला शरण जाण्याची गोष्ट.

    अंक
    दोन
    वेळ
    सुमारे 2 तास
    संहिता
    लिंक लवकरच
  3. आवाज कुणाचा?

    राजकीय-सामाजिक नाटक

    नियतीवर विश्वास ठेवणारा ज्येष्ठ लेखक आणि विज्ञानवादी, नास्तिक दिग्दर्शक. सत्ताधारी पक्ष लेखकाला विधान परिषदेची जागा देऊ करतो: बाहेरून टीका करण्यापेक्षा आत येऊन बदल करा. लेखकाचा आवाज कुणाचा असतो?

    संहिता
    लिंक लवकरच
  4. कथा कुळवाडीच्या सूर्याची

    चरित्रनाट्य

    महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांवर आणि कार्यावर आधारित नाटक. सावित्रीबाईंचं शिक्षणकार्य, गाडगेबाबा आणि गिरणी कामगारांचा लढा: एका सूर्याचा प्रकाश पिढ्यानपिढ्या कसा पोहोचतो त्याची गोष्ट.

    अंक
    दोन
    रंगमंचावर
    लवकरच
  5. रडना मना है !!

    एकांकिका

    एका राज्यात रडण्यावर कर लागतो, नंतर हसण्यावरही. देश, धर्म आणि निष्ठेच्या नावाखाली लोकांना प्रश्न विचारण्यापासून रोखणाऱ्या सत्तेवरची उपहासात्मक एकांकिका.

    वेळ
    40–45 मिनिटे
    संहिता
    लिंक लवकरच

इतर नाटकं

  • काळे निळे
  • जातक आख्यान
  • हॉट-स्पॉट
  • कीप वॉचिंग डोन्ट गो
  • टेपचू
  • व्ही आर एस

© सर्व संहिता प्रा. चेतक घेगडमल लिखित आहेत. सर्व हक्क लेखकाधीन. संहिता वाचण्यासाठी खुल्या आहेत; प्रयोग, स्पर्धा, रूपांतर किंवा कोणत्याही स्वरूपात वापरासाठी लेखकाची लेखी परवानगी आवश्यक आहे.

Chef Chetak Academy · चेंबूर, मुंबई

Proud to be Hotelier

तीस वर्षांचा स्वयंपाकघराचा आणि वर्गखोलीचा अनुभव थेट तुमच्यापर्यंत. इथे फक्त पाककृती नाही, तर स्वतःचा खाद्यव्यवसाय उभा करण्याचं शास्त्र शिकवलं जातं.

प्रवेशासाठी WhatsApp करा

Hotel Entrepreneurship Program

हॉटेल, कॅटरिंग किंवा क्लाउड किचन सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी कोर्स.

कालावधी आणि फी: लवकरच

Become a Hotelier from Home

घरबसल्या शिका आणि घरगुती खाद्यव्यवसाय सुरू करा.

YouTube वर पाहा
संपर्क

भेटूया, बोलूया!

नाटकाच्या प्रयोगाची परवानगी, संहिता, कार्यशाळा, व्याख्यान किंवा अकॅडमीचा कोर्स, कशाहीसाठी संपर्क करा.

WHATSAPP
+91 88281 63676
ईमेल
sgchetak@gmail.com
YOUTUBE
@ChetakGhegadmal
INSTAGRAM
@chef_chetak
FACEBOOK
chetak.ghegadmal
पत्ता
चेंबूर, मुंबई 400071